नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२००० रुपये अनुदान मिळेल.
जर का तुम्ही प्रधान मंत्री पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता महाराष्ट्र शासनाद्वारे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण ६००० रुपये अनुदान मिळेल.
(नमो शेतकरी योजना रजिस्ट्रेशन)नमो शेतकरी योजने साठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, जर का तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजने साठी अर्ज केला नाही तर लवकरात लवकर करून या दोन्ही योजनांचा लाभ घ्या.
फायदे:
१) PM KISAN नुसार पात्र शेतकरी कुटुंबांना २०००/- रु प्रति हप्ता चा फायदा होईल.
२) PM KISAN मध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना NSMNY चा लाभ मिळेल.
३) पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान आणि एन NSMNY या दोन्ही योजनांमधून एका वर्षात १२०००/-₹ लाभ होईल.
पात्रता:
दिनांक ०१/०२/२०१९ रोजी शेत जमीन धारण करणारे शेतकरी कुटुंबे पती-पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश असलेले प्रधानमंत्री किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेसाठी पात्र आहेत.
अर्ज प्रक्रिया:
ऑनलाइन
१) नोंदणी करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे:
१)आधार कार्ड
२)सातबारा
३)8-अ,
४)फेरफार
५)रेशन कार्ड
.jpeg)