लाडक्या बहिणींना गॅस सिलिंडर मोफत - West Nation18



मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची शासनाची योजना आहे. 

त्यानुसार लाखो लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. पण, सोलापूर जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख शिधापत्रिका धारकांपैकी अंदाजे एक लाख जण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभापासून दूरच आहेत. 

त्यामागील प्रमुख कारणे म्हणजे, त्या कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावे आहे. 

या पार्श्वभूमीवर आता त्यांना जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन साध्या कागदावर अर्ज करून आधारकार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शन वरील नाव बदलून मिळणार आहे. 

 त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळविता येणार आहेत. 

 सुरवातीला संबंधित लाभार्थीस संपूर्ण पैसे द्यावे लागतील, त्यानंतर काही दिवसांनी शासनाचे अनुदान त्या लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा होत आहे.


*🙏कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा..*