Best winter tourist place in India - West Nation18

 Best winter tourist spots: भारतात हिवाळ्यात फिरण्यासाठी ही ठिकाणे एकदम बेस्ट; सहलीचा आनंद होईल दुप्पट.

आज आपण काही अशा ठिकाणाबाबत जाणून घेणार आहोत जेथे जाऊन तुम्हाला सहलीचा आनंद दुप्पट झाल्यासारखं वाटेल 




Tourist Places: हिवाळ्यात थंडगार वातावरण बघून अनेकांना एखाद्या निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायला आवडते. हिवाळा हा असा ऋतू आहे जेथे तुम्ही शांतपणे कमी उन्हात आणि गार वातावरणात फिरू शकता. आज आपण अशा काही ठिकाणाबाबत जाणून घेणार आहोत जेथे जाऊन तुम्हाला सहलीचा आनंद दुप्पट झाल्याचा अनुभव येईल.


शिमला - ज्या पर्यटकांना ही वर्षा अनुभवायचा आहे आणि बर्फाच्छादित शहर शोधायचे आहे त्यांच्यासाठी हिवाळ्यात शिमला हे एक उत्तम ठिकाण आहे. शिमला या ठिकाणी हिवाळ्यात आवर्जून जावे.



गोवा - दिवाळीनंतरच्या पडलेल्या थंडीत गोव्याला जाणे कधीही बेस्ट या वेळेत समुद्रकिनारी रम्य आणि रंजक वातावरण अनुभवायला मिळते. तसेच दुपारच्या वेळी थंडीच्या दिवसात तुम्हाला उबही मिळेल. समुद्रकिनाराच्या लाखात तुमचं मन प्रसन्न करतील. हिवाळ्यात नाताळच्या सुट्ट्यांमध्ये या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत नक्की अनुभव घ्यावा.


गुलमर्ग - गुलमर्ग हे अतिशय प्रेक्षणीय थंड हवेचे ठिकाण आहे. जगातला स्वर्ग येथे गेल्यावर तुम्हाला नक्कीच आठवेल. एडवेंचर लोकांसाठी हे ठिकाण बेस्ट आहे. हिवाळ्यात या शहरावर जणू बर्फाची चादर झाकल्याचे जाणवते. हिवाळ्यात हॉलिडे साठी हे ठिकाण आपली परफेक्ट आहे.


अंदमान - अंदमान हे गोव्यापेक्षा फार वेगळे ठिकाण आहे तुम्हाला जर रिलॅक्स करण्यासाठी सहलीला जायचं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे हिवाळ्यात फिरण्यासाठी असलेल्या बेस्ट ठिकाणांपैकी एक असे हे ठिकाण आहे तुम्ही या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स करू शकता.


केरळ - या ठिकाणी असलेल्या हिल स्टेशनवर जाऊन तुम्हाला एकदम बेस्ट वाटेल. तेथील मंदिरात तुम्हाला वेगळीच प्रसन्नता दिसून येईल. स्पाइस टूर हे केरळमधील टॉप ऍक्टिव्हिटीज मधील एक आहे. बोटीच्या माध्यमातून तुम्ही तिथल्या शिखरांची राईड ही करू शकता.